नागरिकांची सनद - आरबीआय - Reserve Bank of India

RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Citizens' Charter(footer link) Banner

MemorialLectureSearchBar

Search Results

नागरिकांची सनद

क्र . सेवेचे वर्णन सेवा देण्यासाठी लागणारा वेळ
बँकिंग विभागात सादर केलेल्या धनादेशाच्या आधारे (आरबीआयमध्ये एका बँकेच्या चालू खात्यातून दुसऱ्या बँकेच्या चालू खात्यात निधी) हस्तांतरित करणे. बैंकिंग साधन मिळाले की लगेच.
आरबीआय मध्ये चालू खाते असणाऱ्या बँकेद्वारे रोख रक्कम जमा करणे १५ मिनिटे (रक्कमेच्या आकारावर अवलंबून)
आरबीआय मध्ये चालू खाते असणा-या बँकेद्वारे रोख रक्कम काढणे २० मिनिटे (रक्कमेच्या व्याप्तीवर अवलंबून)
डिमांड ड्राफ्ट जारी करणे १ तास
चेक बुक जारी करणे २० मिनिटे
बँकांद्वारे ठेवलेल्या चालू खात्यांचे दैनंदिन विवरण सादर करणे सीबीएस-ई-कुबेर पोर्टलवर खातेधारकांसाठी त्यांच्या कडे ऑनलाइन उपलब्ध आहेत.
पुनर्वित्त सुविधा आणि कर्जाचे वितरण त्याच दिवशी किंवा विनंती केल्याप्रमाणे.
टीप: वेळमर्यादा कामकाजाचे सामान्य दिवस दर्शवते.
क्रमांक सेवेचे वर्णन सेवा देण्यासाठी लागणारा वेळ
बाह्य व्यावसायिक कर्ज (ईसीबी) / विदेशी चलन परिवर्तनीय रोखे (एफसीसीबी)  
  मान्यताप्राप्त मार्गांतर्गत व्यापार क्रेडिट ७ कार्य दिवस
  स्वयंचलित मार्गांतर्गत आधीच उपलब्ध असलेल्या ईसीबी साठी विद्यमान फ्रेमवर्कमधून विचलनासाठी मान्यता १५ कार्य दिवस
  ईसीबी - मंजूरी मार्गाअंतर्गत (अधिकृत समितीच्या अधिकाराखाली असलेले वगळून) ३० कार्य दिवस
विदेशी गुंतवणूक  
  समभागांची तारण ४० कार्य दिवस
  शाखा/संपर्क कार्यालयासाठी परवाना जारी करणे ४० कार्य दिवस
  आगाऊ प्रेषण परतावा ७ कार्य दिवस
  परदेशी सहयोग - सामान्य परवानगी मार्ग (FC-GPR) रेकॉर्डवर घेतले जाईल ३० कार्य दिवस
परदेशात भारतीय गुंतवणूक  
  परदेशी संयुक्त उपक्रम आणि पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांमधील गुंतवणूक (स्वयंचलित मार्गाने समाविष्ट नाही) ४० कार्य दिवस
  परदेशी संयुक्त उपक्रम/ उपकंपन्यांमधील समभागांची निर्गुंतवणूक - मंजुरीच्या मार्गाखाली ४० कार्य दिवस
  मान्यता मार्ग अंतर्गत इतर परदेशी गुंतवणूक ४० कार्य दिवस
  युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UIN) चे वाटप ऑनलाइन अहवाल प्रणालीद्वारे त्वरित स्वयं व्युत्पन्न
निर्यात  
  निर्यातीसाठी जीआर फॉर्म औपचारिकता माफ करण्याची परवानगी@ ७ कार्य दिवस
  सेट ऑफ / राइट ऑफ@ ७ कार्य दिवस
  ACU यंत्रणेच्या बाहेर प्राप्ती / देय निर्यात करा@ ७ कार्य दिवस
  परतावा / आगाऊ राखून ठेवणे@ ७ कार्य दिवस
  I/EDPMS समस्यांचे निराकरण@ ७ कार्य दिवस
आयात  
  थेट आयात@ ७ कार्य दिवस
  तिसरा देश / व्यापारी व्यापार / गोदाम@ ७ कार्य दिवस
  ACU यंत्रणा बाहेर प्राप्ती / देय आयात करा@ ७ कार्य दिवस
इतर  
  फेमाच्या उल्लंघनांचे कंपाउंडिंग करणे १८० दिवस
@ निश्‍चित केलेली कालमर्यादा प्रादेशिक कार्यालये (आरओ) येथे प्रकरणे निकाली काढण्याशी संबंधित आहेत. एडी बँक/आरओच्या प्रत्यायोजित अधिकारांमध्ये न येणाऱ्या आणि सेंट्रल ऑफिस (सीओ) कडे संदर्भित केलेल्या प्रकरणांच्या संदर्भात सेवा प्रदान करण्यासाठी लागणारा वेळ, सीओलापूर्ण माहिती/कागदपत्रांसह अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून २० कामकाजाचे दिवस असेल. धोरणविषयक बाबींचा समावेश असलेल्या प्रकरणांचा या कालमर्यादेत समावेश केला जाणार नाही.

 

अस्वीकरण

  • निर्धारित कालमर्यादा आवश्यक मान्यतेसाठी अपेक्षित कागदपत्रांच्या संपूर्ण संचाच्या प्राप्तीच्या अधीन आहेत.

  • फेमा, १९९९ किंवा त्यांतर्गत केलेल्या नियम/विनियमांतर्गत जेथे सरकार आणि/किंवा इतर एजन्सींकडून मंजूरी/विना-हरकत/अधिक माहिती (इनपुट्स)/टिप्पण्या अपेक्षित असतील/मागितल्या असतील किंवा इतर विशिष्ट कारणास्तव जे अधिकारप्राप्त समितीकडे मंजुरीसाठी पाठवले जातात अशा प्रकरणांसाठी निर्धारित कालमर्यादा लागू होत नाही.

क्र . सेवेचे वर्णन सेवा देण्यासाठी लागणारा वेळ
रोख रकमेसह सादर केलेल्या चालानाची पोचपावती २० मिनिटांच्या आत (कामाची व्याप्ति आणि रोख रक्कम यावर अवलंबून)
रिझव्‍‌र्ह बँकेत खाती ठेवणार्‍या सरकारी विभागांद्वारे जारी केलेल्या धनादेशांसह सादर केलेल्या पावती चालनाची पोचपावती ३० मिनिटांच्या आत
इतर बँकांवर काढलेल्या स्थानिक धनादेशांसह सादर केलेल्या चालानाची पोचपावती ३ स्पष्ट कामकाजाच्या दिवसांनंतर
बाहेरगावच्या चेकसह सादर केलेल्या चालानाचे वितरण ७ दिवस (चार महानगरांसाठी)
१५ दिवस इतर केंद्रांसाठी
सरकारी विभागांना स्क्रोल सादर करणे पुढील कामकाजाच्या दिवशी
सरकारी विभागांना मासिक विवरणपत्रे सादर करणे पुढील महिन्याच्या दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी
शासनाकडून धनादेशाद्वारे रोख रक्कम काढणे २० मिनिटे (पैसे काढण्याच्या प्रमाणावर अवलंबून)
एजन्सी बँकांकडून डेबिट/क्रेडिट स्क्रोलची पावती आणि दावे/सेटलमेंटची परतफेड दैनंदिन आधारावर
क्र . सेवेचे वर्णन सेवा देण्यासाठी लागणारा वेळ
डुप्लिकेट सिक्युरिटीज जारी करणे
(ए) सरकारी वचनपत्र (जीपी नोट )
सरकारी राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३ महिने
  (बी) डुप्लिकेट पावती दावा दाखल केल्यानंतर २ दिवसांच्या आत
व्याज वॉरंटाचे पेमेंट
  (ए) स्टॉक प्रमाणपत्र देय तारखेला
  (बी) एसजीएल देय तारखेला
  (सी) बचत रोखे देय तारखेला
(ए) तारण, धारणाधिकार इ.चे हस्तांतरण / आवाहन(invocation) ४ दिवस
  (बी) एन्फेसमेंट बदलणे मूळ लोक ऋण कार्यालयाकडून विशेष रद्दबातल सूचना मिळाल्याच्या तारखेपासून २ दिवस
  (सी) रूपांतरण ४ दिवस
एसजीएल खात्यात क्रेडिट ३ दिवस
एसजीएल ला डेबिट करून स्क्रिप जारी करणे २ दिवस
परतफेडीसाठी सिक्युरिटीज प्राप्त करणे ५ दिवस
एसजीएल हस्तांतरण १ दिवस
मुखत्यारपत्र आणि प्रमाणपत्राची नोंदणी १ दिवस
इतर सेवा
  (ए) परीक्षण १ दिवस
  (बी) विक्रय शक्तीच्या नोंदणीचे प्रमाणपत्र १ दिवस
  (सी) नूतनीकरण ६ दिवस
  (डी) सुरक्षा कक्षातून काढणे १ दिवस
१०. (डी) सुरक्षा कक्षातून काढणेtd> १ दिवस
11. नामांकन नोंदणी १ दिवस
१२ तारण, धारणाधिकार, इ.ची नोंदणी आणि रद्द करणे.  
  (ए) स्टॉक प्रमाणपत्र ३ दिवस
  (बी) एसजीएल १ दिवस
क्र. क्र. सेवेचे वर्णन* सेवा प्रदान करण्यासाठी लागणारा वेळ
नाणी जारी करणे १५ मिनिटांच्या आत (रक्कमेच्या प्रमाणावर अवलंबून)
नाण्यांची पावती १५ मिनिटांच्या आत (रक्कमेच्या प्रमाणावर अवलंबून)
मळलेल्या नोटांची देवाणघेवाण १५ मिनिटांच्या आत (रक्कमेच्या प्रमाणावर अवलंबून)
सदोष/फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण ३० मिनिटांच्या आत (रक्कमेच्या प्रमाणावर अवलंबून)
*उपलब्ध सेवेची तरतूद कार्यालयांमध्ये वेगवेगळी असू शकते.
व्यावसायिक बँका
क्र. क्र. नियामक मंजुरीचे वर्णन आवश्यक वेळ
१. खाजगी बँक परवाना - तत्वतः मान्यता ९० दिवस@
२. बँकेच्या भरणा झालेल्या भाग भांडवल (पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल) पैकी पाच टक्के किंवा त्याहून अधिक शेअर्सच्या संपादन/हस्तांतरणासाठी बँकांना मान्यता ९० दिवस
३. बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ९ नुसार बिगर बँकिंग मालमत्ता ७ वर्षांपेक्षा जास्त आणि १२ वर्षांपर्यंत ठेवण्यासाठी बँकांना मान्यता ३० दिवस
४. भांडवली साधनांवर (कॅपिटल इन्स्ट्रुमेंट्स) कॉल ऑप्शन वापरणे / कूपन पेमेंटची पूर्तता साठी बँकांना मान्यता १५ दिवस
५. वित्तीय सेवा कंपन्यांमध्ये उपकंपनी/संयुक्त उपक्रम/सहयोगी स्थापन करणे/ धोरणात्मक गुंतवणूक करण्यासाठी बँकांना मान्यता ९० दिवस
६. बँकांना खातेनिहाय गुंतवणूक सल्लागार सेवा, पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा किंवा स्टॉक ब्रोकिंग, म्युच्युअल फंड, व्हेंचर कॅपिटल फंड, विमा किंवा पेन्शन व्यवस्थापन यासारख्या उपक्रमांसाठी मंजुरी ४५ दिवस
७. बँकेच्या/तिच्या उपकंपनीच्या पॅरा-बँकिंग क्रियाकलापांची व्याप्ती वाढवण्यासाठी बँकांना परवानगी ४५ दिवस
८. निर्धारित प्रुडेंशियल मर्यादेपलीकडे गैर-वित्तीय सेवा कंपन्यांमधील गुंतवणूक ठेवण्यासाठी बँकांना परवानगी ४५ दिवस
९. एसएफबी, पीबी आणि एलएबी सह खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये पूर्णवेळ संचालक (एमडी आणि सीईओ/ईडी/संयुक्त एमडी) आणि अर्धवेळ अध्यक्ष (नॉन-होलटाइम डायरेक्टर) यांची नियुक्ती / पुनर्नियुक्ती ९० दिवस
१०. परदेशी बँकांच्या सीईओ आणि संपूर्ण वेळ संचालक (एमडी आणि सीईओ/ईडी) आणि भारतात कार्यरत असलेल्या विदेशी बँकांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे (डब्ल्यूओएस) अर्धवेळ अध्यक्ष (नॉन-होल टाइम डायरेक्टर) यांची नियुक्ती/पुनर्नियुक्ती ९० दिवस
११. एसएफबी,पीबी आणि एलएबी सह खाजगी क्षेत्रातील बँकांचे पूर्णवेळ संचालक (एमडी आणि सीईओ/ईडी / संयुक्त एमडी) आणि अर्धवेळ अध्यक्ष (नॉन-होल टाइम डायरेक्टर) यांचे मानधन, बोनस आणि कर्मचारी स्टॉक पर्याय (ईएसओपी) ९० दिवस
१२. भारतात कार्यरत विदेशी बँकांचे सीईओ आणि पूर्णवेळ संचालक (एमडी आणि सीईओ / ईडी) आणि संपूर्ण मालकीच्या उपकंपन्या (डब्ल्यूओएस) पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे (डब्ल्यूओएस) अर्धवेळ अध्यक्ष (नॉन-होल टाइम डायरेक्टर) यांचा मोबदला, बोनस आणि कर्मचारी स्टॉक पर्याय ९० दिवस
१३. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पूर्णवेळ संचालक, गैर-कार्यकारी अध्यक्ष आणि अशासकीय संचालकांच्या नियुक्तीसाठी मंजुरी ६० दिवस
१४. देशांतर्गत अनुसूचित व्यावसायिक बँकांच्या (आरआरबी वगळून) वार्षिक बँकिंग आउटलेट विस्तार योजना (ABOEP) मंजूरी, ज्यासाठी सर्वसाधारण परवानगी काढून घेण्यात आली आहे आणि पेमेंट बँका आणि स्थानिक क्षेत्र बँकांसाठी मंजूरी ४५ दिवस
१५. बँकांद्वारे सोने/चांदीच्या आयातीसाठी अधिकृत करणे ६० दिवस
१६. मंजूर एबीओईपी अंतर्गत बँकिंग आउटलेट उघडण्यासाठी अधिकृत करणे ३० दिवस
१७. गिफ्ट सिटी* येथे आईबीयू स्थापन करण्यासाठी बँकांच्या अर्जांवर प्रक्रिया करणे ९० दिवस
@खाजगी क्षेत्रातल्या बैंकांच्या परवान्यांसाठी तत्वतः मान्यता जारी करण्याची कालमर्यादा स्वतंत्र बाह्य सल्लागार समितीकडून अहवाल मिळाल्यापासून सुरू होते.

प्रादेशिक ग्रामीण बँका

१८. आरबीआय कायद्याच्या सेकंड शेड्यूलमधे समावेश/वगळणे ४५ दिवस
१९. बँकिंग आऊटलेट्स उघडण्यासाठी परवानगी / बँकिंग आउटलेट / सेवा शाखा / प्रादेशिक कार्यालयांसाठी परवाना जारी करणे ४५ दिवस
२०. बँकिंग आऊटलेट्स महसूल केंद्राबाहेर स्थलांतरित करण्यास परवानगी ४५ दिवस
२१. बैंकिंग विनियमन कायदा, १९४९ च्या कलम १७(२) अंतर्गत राखीव निधीतून विनियोग ४५ दिवस

नॉन बैंकिंग वित्तीय कंपन्या

क्र. नियामक मंजुरीचे वर्णन आवश्यक वेळ
एसआरओ
१. स्वयं नियामक संघटना (एसआरओ) ला मान्यता ४५ दिवस
नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFCs)
२. नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे (सेक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांव्यतिरिक्त) ४५ दिवस
३. एनबीएफसीद्वारे इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड प्रायोजित करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) ३० दिवस
४. एनबीएफसीचे नियंत्रण/मालकी/व्यवस्थापन बदलणे ३० दिवस
५. विद्यमान एनबीएफसीचे अन्य श्रेणींमध्ये रूपांतर, जसे की कोअर इन्व्हेस्टमेंट कंपन्या-नॉन डिपॉझिट टेकिंग-सिस्टमिकली इम्पॉर्टंट (सीआईसी-एनडी-एसआई), एनबीएफसी-मायक्रो फायनान्स संस्था (एनबीएफसी-एमएफआई), एनबीएफसी-इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपन्या (आईएफसी) आणि एनबीएफसी-फैक्टर्स ३० दिवस
६. शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये बदल ४५ दिवस
७. लाभांशाची घोषणा- (कोणत्याही पीडीला लाभांशाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात काही विशेष कारणे किंवा अडचणी असल्यास, या संदर्भात योग्य तदर्थ वितरणासाठी आरबीआयकडे आगाऊ संपर्क साधू शकतो) ४५ दिवस

सहकारी बँका

ए. प्राथमिक नागरी सहकारी बँकांसाठी केंद्रीय कार्यालयाने दिलेल्या मंजूरी/परवानग्या

क्रमांक नियामक मंजुरीचे वर्णन अपेक्षित वेळ
१. केंद्रीय कार्यालयाने यूसीबी साठी दिलेल्या मंजूरी/परवानग्या
१. कार्यक्षेत्राचा विस्तार
i ) लगतच्या जिल्ह्यांच्या पलीकडे आणि नोंदणीच्या संपूर्ण राज्यापर्यंत
ii) नोंदणीच्या राज्याच्या पलीकडे
iii) बहु-राज्यीय यूसीबी साठी
९० दिवस
२. शाखा स्थलांतरित करणे - एफएसडब्ल्युएम (आर्थिकदृष्ट्या योग्य आणि व्यवस्थित व्यवस्थापन) निकषांचे पालन न करणाऱ्या यूसीबी कडून केंद्र /राज्याबाहेर त्यांची कार्यालये/शाखा स्थलांतरित करण्यासाठी विनंती ९० दिवस
३. यूसीबी च्या शाखा नोंदणीकृत राज्याबाहेर स्थलांतरित करणे ९० दिवस
४. सरकारी रोखे (G-Secs) ची इंट्रा-डे शॉर्ट सेलिंग करण्याची परवानगी ९० दिवस
५. आमच्या ३ एप्रिल २०१० च्या परिपत्रकात विहित केलेल्या अटींच्या अधीन असुरक्षित ऍडव्हान्स एकूण मालमत्तेच्या २५% पर्यंत वाढवण्याची परवानगी ९० दिवस
६. संचालक संबंधी कर्जाची माफी ९० दिवस
७. दीर्घ मुदतीच्या (सबॉर्डिनेटेड) ठेवी (एलटीडी) / परपेच्युअल नॉन-क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स (पीएनसीपीएस) / ठेवींचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यासाठी परवानगी देणे ९० दिवस
८. रु. १०० कोटी आणि त्याहून अधिक ठेवी असणा-या अनुसूचित यूसीबी च्या सीईओ च्या नियुक्ती/ नियुक्तीचे नूतनीकरणासाठी मान्यता ९० दिवस
२. यूसीबी साठी प्रादेशिक कार्यालयांनी दिलेल्या मंजूरी/परवानग्या
९. विविध वॉर्ड/नगरपालिका क्षेत्रात कार्यालये स्थलांतरित करणे ४५ दिवस
१०. फॉर्म - V सादर करण्यासाठी मुदतवाढ (उघडलेल्या शाखांचे तपशील सादर करणे) ९० दिवस
११. अधिकृत केल्या केल्यानंतर परंतु शाखा उघडण्यापूर्वी, त्याच नगरपालिकेतील प्रभागात पत्ता बदलणे ९० दिवस
१२. वार्षिक व्यवसाय योजना आणि नवीन ऑफ-साइट एटीएम अंतर्गत शाखा उघडण्यासाठी अधिकृत करणे ९० दिवस
१३. यूसीबी द्वारे विशेषीकृत शाखा उघडण्यास मान्यता ९० दिवस
१४. इंटरनेट बँकिंग सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी ९० दिवस
१५. लाभांश देण्यास परवानगी ९० दिवस
१६. बँकेच्या नावात बदल ९० दिवस
१७. एनआरई खाती ठेवण्यासाठी/नूतनीकरण करण्यासाठी अधिकृत करणे ९० दिवस
१८. रु. १०० कोटी पेक्षा कमी ठेवी असलेल्या गैर-अनुसूचित यूसीबी च्या सीईओच्या नियुक्ती/ नियुक्तीच्या नूतनीकरणासाठी मंजुरी ९० दिवस
3. विभागात सिफारशी साठी प्राप्त झालेले इतर अर्ज, पण ज्यावर यूसीबी साठी इतर विभाग/ संस्थांकडून मंजूरी/परवानग्या दिल्या गेल्या
१९. केंद्रीकृत पेमेंट प्रणालीशी संबंधित मंजूरी ४५ दिवस
२०. एमटीएसएस ४५ दिवस
२१. एडी-I आणि एडी-II श्रेणी परवाने ४५ दिवस
२२. चालू खाते/ एसजीएल खाते उघडणे ४५ दिवस
२३. क्लिअरिंग हाऊस सदस्यत्व ४५ दिवस
२४. एनडीएस- ओएम सदस्यत्व ४५ दिवस
२५. ग्राहकांना मोबाईल बँकिंगचा विस्तार करण्याची परवानगी ४५ दिवस
२६. बँकर टू इश्यू ४५ दिवस
२७. मर्चंट बँकिंग ४५ दिवस

बी. राज्य आणि केंद्रीय सहकारी बँकांसाठी नियामक मान्यता

१. इतर विभाग/एजन्सींचा समावेश न करता नियामक मंजूरी देण्यात आली

क्रमांक नियामक मंजुरीचे वर्णन अपेक्षित वेळ
राज्य आणि केंद्र सहकारी बँका
भारतातील रहिवासी व्यक्ती/फर्म/कंपनीला एनआरई ठेवींच्या तारणावर कर्ज/अग्रिम अनुदान ३० दिवस
बिगर बँकिंग मालमत्तेची विल्हेवाट लावणे - प्रादेशिक कार्यालयांनी दिलेली मंजूरी ३० दिवस
सहकारी बँकेच्या क्षेत्राच्या बाहेर असलेल्या इतर सहकारी संस्थांच्या शेअर्समधील गुंतवणूक ३० दिवस

२. आंतर-कार्यालय/आंतर-एजन्सी समन्वयाचा समावेश असलेल्या नियामक मंजूरी

क्र. क्र. नियामक मंजुरीचे वर्णन आवश्यक वेळ
राज्य आणि केंद्र सहकारी. बँका
बँकिंग परवाना देणे - केंद्रीय कार्यालयाने दिलेली मंजूरी. ३० दिवस
विहित निकषांची पूर्तता होत नसलेल्या नॉन-पीएसयू बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी ३० दिवस
नाविन्यपूर्ण शाश्वत कर्ज साधने जारी करण्याची परवानगी ३० दिवस
जोखीम सहभाग आणि त्याचे नूतनीकरण न करता कॉर्पोरेट एजंट म्हणून विमा व्यवसाय करण्याची परवानगी. ३० दिवस
को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी आणि परवानगीचे नूतनीकरण ३० दिवस
स्टेट को-ऑप. बँका
स्टेट को-ऑप. बँकांना शाखा परवाना देण्यासाठी परवानगी. ३० दिवस
एक्स्टेंशन काउंटर उघडण्यासाठी परवानगी ३० दिवस
परकीय चलन व्यवसाय इत्यादीसाठी विशेषीकृत शाखा उघडण्यासाठी आणि विद्यमान विस्तार काउंटरांची श्रेणीत वाढ करून पूर्ण शाखांमध्ये रूपांतर करण्यासाठी परवानगी ३० दिवस
परवान्यामध्ये नमूद केलेल्या व्यतिरिक्त वेगळ्या परिसरात/नगरपालिकेच्या प्रभागात बँकेची शाखा स्थलांतरित करण्याची परवानगी. प्रादेशिक कार्यालयांनी दिलेली मंजूरी. ३० दिवस
१० आरबीआय कायदा, १९३४ च्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये समावेश. केंद्रीय कार्यालयाने दिलेली मंजूरी. ३० दिवस

Type Facet

Type

RBI Citizens Charters Footer Note

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा.